Thursday, September 29, 2011

गुन्हा,शिक्षा,घर्म,माफी आणि राजकारण

राजीन गांधीच्या मारेक-याना माफी मिळावी ह्या संदर्भात “तमिळनाडु विधानसभेनं मंजुर केलेल्या प्रस्तावा प्रमाणे प्रस्ताव जर जम्मू-कश्मिर विधानसभेत आणला तर काय देशातील जनतेची इतकी शांत प्रतिक्रिया असती , मला वाटतं नाही” ... ट्विटर वर ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया .
ट्विटरवर व्यक्त करण्यात आलेली हि प्रतिक्रिया जम्मु कश्मिर विधानसभेत प्रत्यक्षात येऊ पाहतेय . आमदार राशिद खान यांनी अफजल गुरूची दया याचिका मंजुर करावी असा प्रस्ताव जम्मू कश्मिर विधानसभेत आणला आहे .
सप्टेबरच्या पहिल्या आठवड्यात तमिलनाडु विधानसभानं सर्वसहमतीनं मजुर करुन राष्ट्रपतीकडे अपील केलं राजीव गांधीच्या दोषी तीन आरोपींना क्षमादान मिळावं .
ओमर अब्दुलांच्या ट्विटर वर भाजपानं प्रतिक्रिया दिली , “ओमर हुरियत ची भाषा बोलतायत” पण याच भाजपनं मग तमिळनाडु विधानसभेनं आणलेल्या प्रस्तावाला का विरोध केला नाही ? राजीव गांधीची हत्या हा पण दहशतवादाचाच प्रकार होता . श्रीलंकेतील तमिळीवाघांच्या ज्या संघटनेनं ही हत्या घडवून आणली त्या संघटनेलाही दहशतवादी संघटनाचं ठरवण्यात आलं होतं .
अफजल गुरू ला 2001 साली संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्या प्रकरणी सर्वोच्य न्यायालयानं 2004 दोषी ठरवलं आहे . अफजल गुरू ला फाशीची शिक्षा ठोठावली , 20 ओक्टोबर 2006 रोजी अफजलला फाशी देण्याची वेळ ठरवण्यात आली. मात्र अफजलच्या पत्नीनं राष्ट्रपतींकडे क्षमायाचना केली, आणि अफजल ची फाशी टळली . ओगस्ट 2011 ला अखेरिस राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी क्षमा याचिकेवर गृहमंत्रालयाकडे अहवाल मागवला , गृहविभागानं विरोध करत राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी ही याचिका रद्द करावी अशी विनंती केली.
भाजपा श्रीनगर विधानसभेत गोंधळ घालुन अफजल गुरू संदर्भातील प्रस्ताव कसा येणार नाही तो प्रयत्न करते आहे . गेल्या काळात ओमर अब्दुल्लानी केलेलं वक्तव्य हे गैरजबाबदार असल्याचं सांगत भाजपा ओमर हुरियतच्या दिशेनं चालल्याची टिका करताय कॉग्रेसनं मात्र ओमर अब्दुलांचं वक्तव्य हे वैयक्तिक असुन त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही असं सांगत या प्रकरणातुन अंग काढुन घेण्याचा प्रयत्न चालवलाय . पण याच कॉग्रेसच्या तमिळनाडुतील आमदारांनी आपल्याच पक्षाच्या माजी पंतप्रधानांच्या मारेक-यांना दया मिळावी या साठी प्रस्तावाला उघड पाठींबा दिला होता .
गुन्हेगारी , शिक्षा आणि धर्म यांची सांगड कधीही घातली जाऊ शकत नाही . अफजल गुरूला फाशी झाल्यास काश्मिर खो-यातील वातावरण चिघळेल अशी भीती जम्मू कश्मिर सरकारला वाटतेय. त्यामुळे सरकार या प्रकरणात कोणतीही स्पष्ट भुमिका घेताना दिसत नाही . मात्र हे प्रत्येकानं लक्षात ठेवायला हवा थोड्याकाळचा राजकिय लाभ देशाच्या भवितव्याच्या मुळावर बेतु शकतो . त्यामुळे कोणत्या मुद्याचं राजकारण करायचं आणि कोणत्या मुद्यांच नाही याचं भान राजकिय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी ठेवायला हवं .
फाशीच्या शिक्षे एवजी माफी जर दिली जाणार असेल तर ती राज्यघटनेनं दिलेल्या अधिकारांच्या आधिन राहुन मानवतेच्या दृष्टीकोनातुनचं ...
मद्रास हायकोर्टानं राजीव गांधीच्या हत्येसाठी दोषी असणा-या मुरूगन , संतन आणि पेरारीवालन यांच्या फिशीच्या शिक्षेला स्थगिती दिलीय ती केवळ 8 आठवड्यासाठी ... गेल्या 9 सप्टेबर ला या तीघांना फाशीची शिक्षा दिली जाणार होती . आठ आठवड्यांच्या प्रतिक्षे नंतर हायकोर्ट काय निकाल देतं यावर राजीव गांधीच्या मारेक-यांचं तर जगण मरण अवलंबुन आहे पण याच निकालाचा आधार अफजल गुरू प्रकरणातही वापरला जाईल त्यामुळे हा निकाल अफजलचंही अभितव्य अप्रत्यक्षपणे ठरवेल .