Saturday, September 29, 2012

अस्वस्थ पोलीस

दंगल मग ती हिंदू-मुस्लिम असो , दलित-सवर्ण किंवा अगदी राजकिय प्रत्येक दंगलीत उध्वस्थ होते ती स्त्री ... दंगलखोरांच्या हातुन किंवा पोलीस गोळीबारात मारल्या गेलेल्या जखमी झालेल्या कुणाची तरी ती आई असते , कधी ती कुणाची बायको , तर कधी कुणाची बहिण ... आणि म्हणूनचं दंगलीत सर्वात आधी कुणाचं सर्वस्व उध्वस्थ होत असेल तर ती महिला असते. गेल्या काळात मुंबईच्या आझाद मैदान परिसरातही धर्माँध दंगलखोरांच्या अत्याचाराला बळी पडलेलीही महिलाच होती मात्र यावेळा अत्याचार झालेली ती महिला सर्वसामान्य नव्हती. मारहाणीला , अत्याचाराला आणि विनयभंगाला बळी पडल्या त्या सात महिला पोलीस कर्माचारी होत्या . त्या सात महिला ज्या पोलिस कर्मचारी म्हणून सर्वसामान्यांच्या आया-बहीणीच्या अब्रुच्या रक्षणा साठी स्वतचं घर , मुलं मागे सोडून वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचं पालन करत होत्या मुंबईच्या आझाद मैदानावर . या महिला कर्मचा-यावर दंगलखोरांकडून अत्याचार करण्यात आला . विनयभंगाचा प्रकार समोर आला मात्र सुरवातीला पोलिस आयुक्त हा धक्कादायक विनयभंगाचा प्रकार मान्य करण्यासही तयार नव्हते ( आपल्याच सहकारांच्या अब्रुचं संरक्षणही आपल्याला करता आलं नाही हे कुठल्या तोंडानं सांगणार ) अखेरीस प्रशासनानं महिला कर्मचा-याचा विनयभंग झाल्याचं मान्य केलं हा प्रकार सदसदविवेक बुध्दी असणा-या प्रत्येकाला धक्कादायक आहे . ज्या आझाद मैदानानं स्वातंत्र्य चळवळीचा लढा पाहिला त्याच आझाद मैदानाच्या परिसरात विनयभंगाचा हा प्रकार घृणास्पद आहे. शनिवार , वेळ दुपारी दोन वाजेची होती या सातही महिला पोलिस कर्मचा-यांना अतिरिक्त पोलीस बळ म्हणून तैनात करण्यात आलं होतं , गरज पडल्यासचं त्याचा वापर करण्यात येणार होता . म्हणुन या कर्मचारी आझाद मैदानाच्या जवळच पुढील आदेशाची वाट पाहत होत्या , या सातही महिला मुंबई पोलिसांच्या सशस्त्र पोलीस दलातील आहेत . त्यापैकी दोघींना मारहाण करण्यात आली त्याच्या हातातील शस्त्र पळवण्यात आली . लोखंडी सळईने मारहाण झाल्याच्या खुणा त्यांच्या अंगावर अजूनही आहेत . चार दिवस रुग्णालयात उपचार घेतल्या नंतर या महिला घरी परतल्यात , शरिरावरिल जखमांवर उपचार तर झाला मात्र त्याच्या मनावर जो आघात झालाय त्याच्या जखमा या खोलवर रुजल्यात . आजही तो प्रसंग आठवला तर त्यांच्या अंगावर काटा उभा राहतो . धर्मांध जमावानं या महिलानां घेरुन मारहाण केली , सळया आणि लोखंडी पट्टयांचा वापर या मारहाणीत करण्यात आली , जमावानं महिलाना एकटं गाढून विनयभंग केला . अत्याचारही करण्यात आले . या महिला त्यावेळी जीवाच्या आकांतानं मदतीची हाक मारत होत्या मात्र त्यांच्या मदतीला आंदोलकांपैकी कोणी तर सोडाच एकही पोलीस कर्मचारी आला नाही . मिळालेल्या महिती नुसार अत्याचार करणारे धर्माधं २० ते २५ वयोगटातील होते. खाकी वेशात असलेल्या महिला पोलीसांचाच विनयभंग करण्यापर्यत दंगलखोरांची मजल गेली होती यातुन पोलीस यंत्रणेची गुंडाना , धर्माधांना काहीच जरब राहीलेली नाही हे सिध्द होतं .

 आठवडा उलटला तरी या महिला भेदरलेल्या अवस्थेत आहेत . पोलीस कर्मचा-याच्या वेशात असताना कोणी अशा पध्दतीनं आपल्या बरोबर वागेल यावर या महीलांनांचा विश्वासचं बसत नाही . “सद्क्षणाय खल निग्रहणाय” हे ब्रीद असलेल्या मुंबई पोलीस दलातील या महिला म्हणाल्या की आमच्या सहका-यावर अत्याचार होत असताना वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलिसांना संयम बाळगण्यास सांगत होते ही कुठली कायदा व्यवस्था कुढला हा संयम. जे अत्याचार झाले त्यामुळे फक्त आम्हाला मानसीक धक्का बसला असं नाही तर आमचं कुटूंबही घडल्या प्रकारानं भेदरुन गेलं आहे . महिला पोलीसांचं मनोधै-यही कोलमडलय . घडला प्रकार हा फक्त महिला पोलिसांवरचा अत्याचार नाही , पोलीस कर्मचा-यांना मारहाणी पुरता मर्यादित नाही तर प्रशासन आणि गृहमंत्र्याना सणसणीत चपराक आहे या शब्दात पोलीस कर्मचारी आपली प्रतिक्रिया नोंदवतात . आपल्यावरील अत्याचाराची रितसर माहिती या कर्मचा-यांनी वरिष्ठांना दिली आहे. तो प्रसंग इतका भयानक होता की, आम्हाला एकटे गाठून जे प्रकार केले गेले ते आम्ही सांगूही शकत नाही, अशी या महिला शिपायांची व्यथा आहे. घडला प्रकार पोलिसांच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याचं सांगण्यात येतय , याची सीडी महिला संघटनांनी मुख्यमंत्र्याच्या हवाली केलीय . मात्र यानंतरही सरकार शंडासारखं थंड आहे . सरकारनं या दंगलखोराना योग्य तो धडा शिकवला नाही तर हे धर्मांध माथेफिरू लवकरचं वस्त्यावस्त्यामधून प्रतीसरकारं स्थापन करतील . म्हणून सरकारनं घडला प्रकार गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे . महिला शिपायांचा विनयभंग करणाऱ्या प्रत्येकाला शोधून काढून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाने कंबर कसली आहे .

 पोलीस कर्मचा-यामध्ये अस्वस्था वाढलीय, पोलीस प्रशासनातील वरिष्ठ आणि सरकार आपल्याला स्वसौरक्षणासाठीही लाठीचा वापर करु देणार नसतील तर सर्वसामान्यांनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं हि प्रतिक्रिया पोलिस कर्मचा-यामधुन उघड पणे व्यक्त होताना पाहिला मिळतेय . पोलीसांमधील अस्वस्थता वाढतेय , महिन्याला मिळसणारा पगार तुटपूजा,सणासुदीला सुट्टीनाही , कामाची वेळ मर्यादा नाही , पालक म्हणून कर्तव्य करायला वेळ नाही . संघटना करुन मागण्यामान्य करण्याची मुभा नाही आणि त्यातच आपल्याच सहकारी महिला कर्मचा-यावर झालेल्या या अत्याचारानं पोलीसांमधली अस्वस्थाता शीगेला पोहोचलीय . अत्याचाराच्या घटनेनंतर काही महिला कर्मचा-यांनी राजनामा देण्याची तयारी सुरू केलीय , त्यासाठी कुटूंबाकडून दबाव असल्याचं या महिला कर्मचा-या कडुन सांगितलं जातय . पुलाखालुन या अगोदरचं बरत पाणी वाहुन गेलय , प्रशासना जर यावेळी जाग आली नाही तर मात्र सरकारला विपरित परिस्थितीला समोर जावं लागणार आहे. शासन आणि प्रशासन सर्वसामान्यातली पत तर सोडाच कर्मचा-यामधली विश्वासार्हताही गमावून बसणार आहे . आज या महिला पोलीस कर्मचा-यांच्या अब्रुला हात घालण्याची मजल या दंगलखोरांची गेलीय उद्या मलबारहिलच्या बंगल्यावरही त्यांची नजर जाईल हे सरकारनं विसरायला नको .... हिच प्रतिक्रिया पोलीस कर्मचा-यामध्ये आहे , पोलीस कर्मचा-याची दबक्या आवाजातली हि प्रतिक्रिया मताचं राजकारण करणा-या राजकारण्यांच डोक ठीकाणावर आणायला पुरेशी आहे . निलेश खरे – ९८२०४४५१०८

No comments:

Post a Comment