Saturday, September 29, 2012

भ्रष्ट अभिव्यक्ती




प्रतिकांचे कालपरत्त्वे संदर्भ बदलतात, हे मान्य करण्यास काहीही हरकत नाहीकाळाबरोबर देशाचे नकाशेही बदलतात म्हणून देशाभिमानाची गरजच नाही, असं आपण म्हणू शकतो का?...तर नाही. असीम त्रिवेंदींची व्यंगचित्रे ही देशद्रोही होती, असं मीही म्हणणार नाहीमात्र त्यातील अनेक चित्र ही असभ्य आणि राष्ट्रीय प्रतिकांची अवहेलना करणारी होती हे मान्य करावेच लागेल.  मै भी अण्णाच्या रुपानं ज्या टोपीचा वापर चळवळीनं केला त्यावरचं ब्रीदही मै भी अरविंद व्हायला वेळ लागल नाहीत्यामुळे चळवळीच्या बदलत्या आस्था आणि अस्मिता या किती स्थलकाल आणि व्यक्तीसापेक्ष आहेत हे त्यावरून सिध्द होतंच. ज्या भारतमातेच्या प्रतिकाचा वापर करुन आंदोलन पेटवण्याचा पर्यत्न झाला, त्याच प्रतिमेचं असभ्य व्यंगचित्र हा युगधर्म नव्हे तर चळवळीतील कार्यकर्त्याची वैचारीक अपरिपक्वता आहे.

हिंदू देवदेवतांची व्यंगचित्र रेखाटल्यानं अस्वस्थ झालेले मोहमद पैगमबराच्या व्यंगचित्रानंतर भारताचा या व्यंगचित्रांशी काहीही संबं नसनही दंगा भडकवणारे आणि 50 वर्षार्वी बाबासाहेबांवर काढलेल्या चित्रावरुन अस्मितेचा प्रश्न करणा-या अनेकांना भ्रष्टाचारविरोधी लढ्यातवापरल्या गेलेल्या सीम त्रिवेदीच्या व्यंगचित्रामधे अभिव्यक्ती दिस लागली. कारण या व्यंगचित्रांमध्ये विटंबना करण्यात आलेली प्रतिकं ही त्यांच्या समाजाशीधर्माशी आणि मतदारांच्या मतांशी निगडीत अशी नाही. ही प्रतिकं आहेत ती भारतीयत्वाची...

असीम त्रिवेदींनी काढलेल्या व्यंगचित्राना अभिरुची संपन्नअभिव्यक्तीच्या कक्षेत बसणारी म्हणायची का? हा प्रत्येक सुज्ञ माणसासमोरचा प्रश्न आहे. तरी रामराज्याची आणि नवनिर्माणाची भाषा करणा-या आणि स्वत: कलाकार असलेल्या काही राजकीय पुढा-यांनी सीमवरील कायदेशीर कारवाई ही कशी बेकायदेशिर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि नकोत्याही वादातून प्रसिध्दी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्नही. (या नेत्यांनी सीमनं रेखाटलेली व्यंग्यचित्र नजरे खालन घातली नसावीत असं आजही मी समजतो) सीमवरचा देशद्रोहाचा खटला हा सरकार आणि मुंबई पोलिसांचा आततायीपणा असला तरी राष्ट्रीय प्रतिकं कायद्याअंतर्गत असीम याची व्यंगचित्र ही गुन्हा ठरु शकतात आणि त्याअंतर्गत म यांना 2 वर्षाची शिक्षा आणि 20 हजाराचा दंडही होऊ शकतो.

व्यंगचित्र हा मळ शब्द व्यंग्य आणि चित्र या दोन शंब्दांचा मिळून बनलेला आहे. यात व्यंग नव्हे तर व्यंग्य असा शब्दाचा वापर आहे. व्यंग्य म्हणजे शारीरिक व्यंग नव्हे तर शाब्दिक चेष्टा, विनोद या अर्थानं हा शब्दाचा वापर केला जातो. असीमची काही चित्र ही अभिरुचीहीन आणि अश्लिल स्वरुपाची आहेत. एका चित्रात असीमनं दोन नग्न पुतळे नकोत्या अवस्थेत दाखवून भ्रष्टाचार आणि राजकारण्याची उपमा या पुतळ्यांना दिली आहे. ही कसली अभिव्यक्ती हा तर टूकारबौध्दिक भिकारपणाच. या व्यंगचित्रांना व्यंगचित्रे  म्हणूनही मान्यता द्यावी का हाच मुळ प्रश्न ? कॉलेज किंवा सार्वजनिक शौच्यालयात काढलेल्या चित्रांना जर कुणाला कलेची अभिव्यक्तीची उपमा द्यायची असेल तर त्यांनी खुशाल द्यावी मात्र त्यातून अपल्या अभिरुचीची जाण आपण समाजाला करुन देत असल्याची त्यांनी जाणीव ठेवावी .
राजकारणी लोकशाहीचे धिंडवडे काढतात मग असीमनं आपला उद्वेग या चित्रांमधन व्यक्त केला तर त्यात काय चुकलं, अशा पध्दतीनं समर्थन करणारेही अनेक आहेत. मात्र चुकीच्या गोष्टीचं, कृतीचं चुकीचे संदर्भ देऊन समर्थन होऊ शकत नाही. राजकारण्यांनी पातळी सोडली म्हणून व्यंगचित्रकारा (पत्रकारांन) त्याच पातळीवर जाण्याची गरज आहे का ?
सविधांनाचा करण्यात आलेला अमानराष्ट्रीय चिन्हांचा करण्यात आलेला अवमान लक्षात घेता अभिव्यक्तीच्या या हिन प्रकाराला इथेच आळा घालण्याची गरज आहे. अन्यथा राजकीयसामाजिक जाणीव नसलेले आणि नाक्यावर बसन अश्लिल गप्पा मारणारेही उद्या साहित्यिक असल्याचा आव आणतील.

सीमनं काढेलेली काही चित्र चांगली असतीलही. मात्र ज्या चित्रांवरुन वाद निर्माण झाला आहे, ती चित्र जर उद्या समाजात पसरली तर त्यातून दंगली उसळण्याचीच शक्यता जास्त आहे.असीमची ही वादग्रस्त चित्र म्हणजे अभिव्यक्तीतील भ्रष्टाचार असच म्हणावं लागेल. 
अभिव्यक्तीच्या नावावर स्वैराचाराला मान्यता देता येणार नाही. अन्यथा फेसबुकट्युटरसारख्या सोशलमीडीयातून याचा प्रचार व्हायला काही तासही लागणार नाही आणि त्यातून पुढची पिढीही अभिव्यक्तीचा अर्थच अश्लिलता असा लावेल.

हिंदू देवदेवतांची विटंबना आणि पैगमबराचं व्यंगचित्र करणा-यांना जीवे मारण्याची धमकी देणा-यांनी थोडातरी देशाभिमान जागृत ठेवावा आणि 
भारतीयत्वाची प्रतिकं असलेल्या चिंन्हाची झालेली ही विटंबना राजकीय फायद्यासाठी न वापरता सारासार विचार करून भूमिका ठरवावी. अन्यथा डेव्हीड लोआर. के. लक्ष्मणदलालबाळासाहेब यांचा व्यंगचित्राकारितेचा वसा पुढे नेणारा येत्या काळात एकही होणार नाही.

राष्ट्रीयत्वाची प्रतिकं ही देश एकसंध ठेवण्यासाठीवैचारीक बैठकीला बळ देण्यासाठी महत्वाची असतातदेशभक्तीच्या माध्यमातून निर्माण झालेल्या भ्रष्टाचाराविरूध्दच्या चळवळीला जर या देशाला अराजतेकडे लोटायचं नसेल आणि भारतीय लोकशाहीत निर्माण झालेल्या उणीवा दुर करायच्या असतील तर चळवळीनं राष्ट्रीय प्रतिकांची भारतीयांच्या मनातील प्रतिमा डागाळणार नाही याची काळजी घ्यायला हवी. अन्यथा या देशाच्या नकाशाची प्रतिमा बदलायला वेळ लागणार नाही. कारण देशाभिमान नसलेले भ्रष्ट मानसिकतेकडे वळण्याचीच जास्त शक्यता असते. देशाच्या सीमेवर रक्षाणासाठी उभे असलेले जवान याच प्रतिकांना स्मरून जीवाची बजी लावत असतात. म्हणून जर हा देश टिकला, ही राष्ट्रीय प्रतिकं टीकली तरचं या लोकशाहीला पारदर्शक करण्याची स्वप्न आपण पाह शकू.

निलेश खरे 

कॉंग्रेस एनसीपी मे टस्सन


कॉग्रेस ओर एनसीपी के बीच का विवाद भलेही खुत्म होते नजर आ रहा हो , एनसीपी अध्यक्ष शरद ने महाराष्ट्र के मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण को फिर एक बार आडे हातो लीया है । विवाद के बाद शरद पवार पहली बार मीडीया से बात कर रहे थे ।

एनसीपी ओर कॉग्रेस के बीच की सुलगती चिंगारी अभी बुछी नही है ।
शरद पवार अभी भी है महाराष्ट्र के मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण से खफा ।
शरद पवार ने फिर एक बार दोहराया है की मुख्यमंत्री एनसीपी के विभागोमे हस्तक्षेप ना करे ।

दबाव के राजनिती मे माहीर शरद पवार कॉग्रेस के साथ की नाराजगी के लढाई मे हारे या जीते इसका फैसला होनेमे शायद कुछ ओर देर लगे ।  लगता तो यही है की शरद पवार की महाराष्ट्र के मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण से नाराजगी अभी तक दुर नही हुवी है । नाराजगीके 10 दिननोके मानमुन्नवर के बाद पवार  मिडीया से पहली बार नवी मुंबई मे बात कर रहे थे ।  कृषीमंत्रालय का जीम्मा पवार ने भेलेही संभाल लीया हो लेकिन पवार की नाराजगी अभी भी शब्दोसे बया हो रही है । पवार ने साफ कर दीया है की कॉग्रेस ने समन्वय ओर निर्णय प्रक्रिया मे सलाह मश्वरा करने का आश्वासन दिया है । इतना नही पवार ने ये भी साफ कर दिया की आनेवाले दिनोमे अपेक्षा है की महाराष्ट्र के मुख्यमंत्री एनसीपी के विभागो मे हस्तक्षेप नही करेंगे ।

शरद पवार के नाराजगी की एक वजहा महाराष्ट्र के एनसीपी के  सिचाई घोटाले को बताया जा रहा था , इसपर पवार ने कहा की अगर मुख्यमंत्री इस मामेले मे व्हाईट पेपर निकाल ने मे लापरवाही दिखाते है तो मैने सिचाई मंत्री को कहा है की वह मिडीया के सामने व्हाईट पेपर प्रकाशित करे । पवार ने बिला नाम लीये चव्हाण को ये तक बता दिया वह जनता से चुनकर नही आते ओर एनसीपी के सभी नेताओके जनता चुनकर देती है ।

शरद पवार के तेवरो से ये तो साफ हो जाता है की पवार केद्र से कम ओर महाराष्ट्र के मुख्यमंत्री से जादा खफा है ।  साफ है की आनेवाले दिनोमे दोनो दलोमे तु तू मै मै का सिलसीला लगातार नजर आयेगा .
निलेश खरे 

अस्वस्थ पोलीस

दंगल मग ती हिंदू-मुस्लिम असो , दलित-सवर्ण किंवा अगदी राजकिय प्रत्येक दंगलीत उध्वस्थ होते ती स्त्री ... दंगलखोरांच्या हातुन किंवा पोलीस गोळीबारात मारल्या गेलेल्या जखमी झालेल्या कुणाची तरी ती आई असते , कधी ती कुणाची बायको , तर कधी कुणाची बहिण ... आणि म्हणूनचं दंगलीत सर्वात आधी कुणाचं सर्वस्व उध्वस्थ होत असेल तर ती महिला असते. गेल्या काळात मुंबईच्या आझाद मैदान परिसरातही धर्माँध दंगलखोरांच्या अत्याचाराला बळी पडलेलीही महिलाच होती मात्र यावेळा अत्याचार झालेली ती महिला सर्वसामान्य नव्हती. मारहाणीला , अत्याचाराला आणि विनयभंगाला बळी पडल्या त्या सात महिला पोलीस कर्माचारी होत्या . त्या सात महिला ज्या पोलिस कर्मचारी म्हणून सर्वसामान्यांच्या आया-बहीणीच्या अब्रुच्या रक्षणा साठी स्वतचं घर , मुलं मागे सोडून वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचं पालन करत होत्या मुंबईच्या आझाद मैदानावर . या महिला कर्मचा-यावर दंगलखोरांकडून अत्याचार करण्यात आला . विनयभंगाचा प्रकार समोर आला मात्र सुरवातीला पोलिस आयुक्त हा धक्कादायक विनयभंगाचा प्रकार मान्य करण्यासही तयार नव्हते ( आपल्याच सहकारांच्या अब्रुचं संरक्षणही आपल्याला करता आलं नाही हे कुठल्या तोंडानं सांगणार ) अखेरीस प्रशासनानं महिला कर्मचा-याचा विनयभंग झाल्याचं मान्य केलं हा प्रकार सदसदविवेक बुध्दी असणा-या प्रत्येकाला धक्कादायक आहे . ज्या आझाद मैदानानं स्वातंत्र्य चळवळीचा लढा पाहिला त्याच आझाद मैदानाच्या परिसरात विनयभंगाचा हा प्रकार घृणास्पद आहे. शनिवार , वेळ दुपारी दोन वाजेची होती या सातही महिला पोलिस कर्मचा-यांना अतिरिक्त पोलीस बळ म्हणून तैनात करण्यात आलं होतं , गरज पडल्यासचं त्याचा वापर करण्यात येणार होता . म्हणुन या कर्मचारी आझाद मैदानाच्या जवळच पुढील आदेशाची वाट पाहत होत्या , या सातही महिला मुंबई पोलिसांच्या सशस्त्र पोलीस दलातील आहेत . त्यापैकी दोघींना मारहाण करण्यात आली त्याच्या हातातील शस्त्र पळवण्यात आली . लोखंडी सळईने मारहाण झाल्याच्या खुणा त्यांच्या अंगावर अजूनही आहेत . चार दिवस रुग्णालयात उपचार घेतल्या नंतर या महिला घरी परतल्यात , शरिरावरिल जखमांवर उपचार तर झाला मात्र त्याच्या मनावर जो आघात झालाय त्याच्या जखमा या खोलवर रुजल्यात . आजही तो प्रसंग आठवला तर त्यांच्या अंगावर काटा उभा राहतो . धर्मांध जमावानं या महिलानां घेरुन मारहाण केली , सळया आणि लोखंडी पट्टयांचा वापर या मारहाणीत करण्यात आली , जमावानं महिलाना एकटं गाढून विनयभंग केला . अत्याचारही करण्यात आले . या महिला त्यावेळी जीवाच्या आकांतानं मदतीची हाक मारत होत्या मात्र त्यांच्या मदतीला आंदोलकांपैकी कोणी तर सोडाच एकही पोलीस कर्मचारी आला नाही . मिळालेल्या महिती नुसार अत्याचार करणारे धर्माधं २० ते २५ वयोगटातील होते. खाकी वेशात असलेल्या महिला पोलीसांचाच विनयभंग करण्यापर्यत दंगलखोरांची मजल गेली होती यातुन पोलीस यंत्रणेची गुंडाना , धर्माधांना काहीच जरब राहीलेली नाही हे सिध्द होतं .

 आठवडा उलटला तरी या महिला भेदरलेल्या अवस्थेत आहेत . पोलीस कर्मचा-याच्या वेशात असताना कोणी अशा पध्दतीनं आपल्या बरोबर वागेल यावर या महीलांनांचा विश्वासचं बसत नाही . “सद्क्षणाय खल निग्रहणाय” हे ब्रीद असलेल्या मुंबई पोलीस दलातील या महिला म्हणाल्या की आमच्या सहका-यावर अत्याचार होत असताना वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलिसांना संयम बाळगण्यास सांगत होते ही कुठली कायदा व्यवस्था कुढला हा संयम. जे अत्याचार झाले त्यामुळे फक्त आम्हाला मानसीक धक्का बसला असं नाही तर आमचं कुटूंबही घडल्या प्रकारानं भेदरुन गेलं आहे . महिला पोलीसांचं मनोधै-यही कोलमडलय . घडला प्रकार हा फक्त महिला पोलिसांवरचा अत्याचार नाही , पोलीस कर्मचा-यांना मारहाणी पुरता मर्यादित नाही तर प्रशासन आणि गृहमंत्र्याना सणसणीत चपराक आहे या शब्दात पोलीस कर्मचारी आपली प्रतिक्रिया नोंदवतात . आपल्यावरील अत्याचाराची रितसर माहिती या कर्मचा-यांनी वरिष्ठांना दिली आहे. तो प्रसंग इतका भयानक होता की, आम्हाला एकटे गाठून जे प्रकार केले गेले ते आम्ही सांगूही शकत नाही, अशी या महिला शिपायांची व्यथा आहे. घडला प्रकार पोलिसांच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याचं सांगण्यात येतय , याची सीडी महिला संघटनांनी मुख्यमंत्र्याच्या हवाली केलीय . मात्र यानंतरही सरकार शंडासारखं थंड आहे . सरकारनं या दंगलखोराना योग्य तो धडा शिकवला नाही तर हे धर्मांध माथेफिरू लवकरचं वस्त्यावस्त्यामधून प्रतीसरकारं स्थापन करतील . म्हणून सरकारनं घडला प्रकार गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे . महिला शिपायांचा विनयभंग करणाऱ्या प्रत्येकाला शोधून काढून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाने कंबर कसली आहे .

 पोलीस कर्मचा-यामध्ये अस्वस्था वाढलीय, पोलीस प्रशासनातील वरिष्ठ आणि सरकार आपल्याला स्वसौरक्षणासाठीही लाठीचा वापर करु देणार नसतील तर सर्वसामान्यांनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं हि प्रतिक्रिया पोलिस कर्मचा-यामधुन उघड पणे व्यक्त होताना पाहिला मिळतेय . पोलीसांमधील अस्वस्थता वाढतेय , महिन्याला मिळसणारा पगार तुटपूजा,सणासुदीला सुट्टीनाही , कामाची वेळ मर्यादा नाही , पालक म्हणून कर्तव्य करायला वेळ नाही . संघटना करुन मागण्यामान्य करण्याची मुभा नाही आणि त्यातच आपल्याच सहकारी महिला कर्मचा-यावर झालेल्या या अत्याचारानं पोलीसांमधली अस्वस्थाता शीगेला पोहोचलीय . अत्याचाराच्या घटनेनंतर काही महिला कर्मचा-यांनी राजनामा देण्याची तयारी सुरू केलीय , त्यासाठी कुटूंबाकडून दबाव असल्याचं या महिला कर्मचा-या कडुन सांगितलं जातय . पुलाखालुन या अगोदरचं बरत पाणी वाहुन गेलय , प्रशासना जर यावेळी जाग आली नाही तर मात्र सरकारला विपरित परिस्थितीला समोर जावं लागणार आहे. शासन आणि प्रशासन सर्वसामान्यातली पत तर सोडाच कर्मचा-यामधली विश्वासार्हताही गमावून बसणार आहे . आज या महिला पोलीस कर्मचा-यांच्या अब्रुला हात घालण्याची मजल या दंगलखोरांची गेलीय उद्या मलबारहिलच्या बंगल्यावरही त्यांची नजर जाईल हे सरकारनं विसरायला नको .... हिच प्रतिक्रिया पोलीस कर्मचा-यामध्ये आहे , पोलीस कर्मचा-याची दबक्या आवाजातली हि प्रतिक्रिया मताचं राजकारण करणा-या राजकारण्यांच डोक ठीकाणावर आणायला पुरेशी आहे . निलेश खरे – ९८२०४४५१०८